मोफत देवदर्शन सहलीतून विशाल परबांचे ‘पुण्यसंचय’.

मोफत देवदर्शन सहलीतून विशाल परबांचे ‘पुण्यसंचय’.

वेंगुर्ला. 

   भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील ५० वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार विशाल परब यांच्या उपस्थितीत चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे ह.भ.प.सावळाराम कुर्ले महराज यांच्या हस्ते झाला.
   विशाल परब यांनी नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन असे अभिवचन दिले होते.वारकऱ्यांना दिलेल्या वचनाची पुर्तता विशाल परब यांनी प्रत्यक्ष देवदर्शन बस सोडून केली.यावेळी  तुळजापूर - अक्कलकोट - पंढरपूर - नृहसिंहवाडी - महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
  यावेळी बोलताना विशाल परब असे म्हणाले की सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून या पंढरपुर वारीचे नियोजन आम्ही महिनाभरापूर्वीच केले होते. या कार्यक्रमाचा आज शुभारंभ होत आहे.जिल्ह्यातील पहिली सुरुवात ही वेंगुर्ल्यातून होत आहे.यानंतर सर्व तालुक्यातून वारकरी हे पंढरपूरला जातील. यापुढे दर आठवड्याला अशा वारी निघतील असे यावेळी विशाल परब यांनी सांगून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
    भाजप जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई बोलताना असे म्हणाले की आत्ताच महाराष्ट्र शासनाचा वारकऱ्यांना वीस हजारापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय झाला असून ही वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.त्यामुळे वारकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र शासनाचे वारकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.
    यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, माजी नगराध्यक्ष  दिलीप गिरप, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, मनोहर तांडेल, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, महिला व स्थानिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.