पनवेल येथील चिंधरण ग्रामपंचायत यांची परुळे ग्रामपंचायतीला भेट

वेंगुर्ला
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चिंधरण ग्रामपंचायत यांच्याकडून परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. आपल्या ग्रामपंचायतीला भेट देऊन काही नवीन संकल्पना ग्रामपंचायतला अभ्यासाला मिळतील या करिता सदर अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले गेले होते यावेळी सरपंच एकनाथ पाटिल, उपसरपंच सुजित पाटिल, सदस्य दीपिका सोनावणे, इंदिरा कडू, इंदिरा पवार, संतोष देशकर, मनोज कुंभारकर, कमल पाटिल, जीवन पाडकर, कुसुम पाटिल ग्रामपंचायत अधिकारी वैशाली जाधव यांसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यानी समितीचे स्वागत केले व ग्रामपंचायतने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर त्यांनी काथ्या व्यवसाय प्रकल्प तसेच सांडपाणी प्रक्रिया युनिट, पाणी एटियम या उपक्रमाला भेट दिली व माहिती घेतली.