शिल्पा मर्गज - हिर्लेकर यांना विधी क्षेत्रातील पी.एच.डी

शिल्पा मर्गज - हिर्लेकर यांना विधी क्षेत्रातील पी.एच.डी

 

मालवण

 

     व्हिक्टर डॉन्टस चॅरिटेबल अँड एज्युकेशन फाऊंडेशन संचलित व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालय कुडाळ येथे प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रा. सौ. शिल्पा मर्गज - हिर्लेकर यांना राजस्थान येथील विद्यापीठामधून कायद्यामधील पी. एच. डी. पदवी बहाल करण्यात आली आहे. सदर डॉक्टरेट पदवी साठी "भारतीय संविधानाअंतर्गत 'जगण्याचा आणि जीविताचा हक्क' याबाबत मा.भारतीय सर्वोच्च न्यायालयाची भूमिका" हा संशोधनाचा विषय होता. व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच म्हणजे सन २००८ पासून विधी महाविद्यालयामध्ये त्या कार्यरत आहेत. तसेच मागील १३ वर्षांपासून प्रभारी प्राचार्या म्हणून त्यांनी यशस्वीपणे विधी महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, ॲड. संदेश तायशेटे, ॲड. राजशेखर मलुष्टे तसेच विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेचे अध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस व इतर सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.