पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी
सिंधुदुर्गनगरी
पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली आहे.
या परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.

konkansamwad 
