खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थी सवांद उपक्रम उत्साहात साजरा.

खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थी सवांद उपक्रम उत्साहात साजरा.

वेंगुर्ला.

   महाराष्ट्र करियर कट्टा व बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला यांच्या सयुंक्त विद्यमाने विद्यार्थी सवांद यात्रेच्या निमित्ताने प्रथम वर्ष बी. ए. बी. कॉम, बी. एस्सी. व हॉर्टिकल्चर च्या विद्यार्थ्यांसाठी दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी महाविद्यालयांत “उद्याचा विकसित भारतासाठी आजच्या युवकांना मार्गदर्शन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली गेली. या विद्यार्थी सवांद यात्रेसाठी श्री यशवंत शितोळे सर, अध्यक्ष  महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. गेली अनेक दिवस शितोळे सर महाराष्ट्रातील जवळपास तीन हजार महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यशी हितगुज साधून त्यांच्यामध्ये योग्य करियरविषयी मागर्दर्शन करीत आहेत. आजच्या या आयोजित करीशाळेत  श्री  यशवंत शितोळे सरानी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना “शैक्षणिक प्रगतीच्या  “एस. आय. पी” वर लक्ष केंद्रित करून स्वतःसोबत समाजाची व देशाची प्रगती केली पाहिजे, व आजच्या मोबाईल युगात त्याचा योग्य वापर केला तर हि प्रगती वेळेत साधने शक्य आहे” अशी भावना वेक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.चौगले होते. “महाराष्ट्र करियर कट्टा मार्फत दिल्या जाणाऱ्या कौशल्य विकास कर्यक्रमाचा विद्यार्थांनी लाभ घेऊन नोकरी मिळवावी व महाविद्यालयाचे नाव मोठे करण्याचे  आव्हान मा.प्राचार्य यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले”.
    या विद्यार्थी सवांद यात्रेसाठी शिक्षणप्रसारक मंडळ कोल्हापूरचे चेरमन डॉ.मंजिरी मोरे-देसाई, सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई आणि पेट्रॉन कॉन्सिल मेंबर श्री दौलत देसाई साहेबानी शुभेच्छा दिल्या.
   या निमित्ताने मंच्यावर महारष्ट्र करियर कट्टा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकरणीचे प्राचार्य प्रवर्तक, आनंदी बाई रावराणे कॉलेजचे प्राचार्य सी.एस.काकडे, जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे,  तालुका समन्वयक डॉ. रमाकांत गावडे, संस्था प्रतिनिधी श्री सुरेंद्र चव्हाण, नॅक समन्वयक प्रा.एस.एच.माने उपस्थित होते. 
   सदर सवांद यात्रेच्या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या “महाराष्ट्र करियर कट्टाचे” समन्वयक डॉ. बी.जी. गायकवाड यांनी केले, तर आभार प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. एम. पाटोळे सरानी वेक्त  केले आणि सम्पूर्ण कार्यशाळेचे  सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर सरानी केलं.हि एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, एन.सी.कॅडेटस आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.