माणगाव हायस्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.

कुडाळ.
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सहकार्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एकनाथ केसरकर, निवृत्त क्रीडा शिक्षक कमलाकर धुरी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, माणगाव हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, क्रीडाशिक्षक अमोल दळवी, नारायण केसरकर, यतीन धुरी, कृष्णा सावंत,राजेंद्रप्रसाद कदम, लवू सावंत, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांचे प्रमुख श्री.शिंद, धुरी मॅडम तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी समीर सावंत सहभागी सर्व खेळाडू उपस्थित होते.
यानिमित्त कुमारी ईश्वरी मोहिते या विद्यार्थिनीने मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच यानिमित्ताने शंभर मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये 17 वर्षे मुले- मुली 19 वर्षे मुले - मुली सहभागी झाले होते.विजेत्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रांझ मेडल मेडल अनुक्रमे प्रदान करण्यात आले.
१७ वर्षांखालील मुली-
वैष्णवी आत्माराम संवत--प्रथम
स्वरांगी दत्ताराम केसरकर द्वितीय
भूमिका प्रवीण सावंत तृतीय
१९ वर्षांखालील मुली-
समिक्षा चंद्रकांत पवार. - प्रथम,
आर्या विठ्ठल भरतू द्वितीय, प्रीती रामचंद्र वरक तृतीय
१७ वर्षांखालील मुले-
गणेश संजय केसरकर प्रथम, देवू संजय शेडगे द्वितीय, अतुल दयानंद राऊळ तृतीय
१९ वर्षांखालील मुले वैभव गुरनाथ कोरगावकर -
प्रथम, योगेंद्र राजेंद्र भरतू द्वितीय, हर्षद संजय परब तृतीय
श्री कमलाकर धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व श्री मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच बक्षीस पात्र मुलांना अनुक्रमे गोल्ड मेडल सिल्वर मेडल व ब्रांझ मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले या वेळा क्रीडाप्रेमी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते सदर विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सगुण धुरी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयप्रकाश आकेरकर उपाध्यक्ष दत्ताराम जोशी, संचालक बाली नानचे, साईनाथ नार्वेकर, चंद्रशेखर जोशी, दत्तदिगंबर धुरी, महेश भिसे यांनी अभिनंदन केले आहे.