वैभववाडीत जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी ४० अर्ज वैध, २ अर्ज अवैध

वैभववाडीत जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी ४० अर्ज वैध, २ अर्ज अवैध

 

वैभववाडी

 

     वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छानणी करण्यात आली. या छानणीत 40 अर्ज वैध ठरले आहेत, तर 2 अर्ज अवैध ठरले आहेत.

उबाठा सेनेला झटका

कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा सेनेचे अधिकृत उमेदवार सुनील सदानंद नारकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे.

भाजपा उमेदवार बिनविरोध

भाजपाचे कोकिसरे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार साधना सुधीर नकाशे या बिनविरोध झाल्या आहेत. तर कोळपे जिल्हा पारिषदेतही भाजपाच्या प्रमोद रावराणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर स्पष्ट होणार चित्र

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत कोण कोण अर्ज मागे घेतात त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील व गटविकास अधिकारी श्री पाटील यांच्या उपस्थित उमेदवारांच्या अर्जाची छानणीला सुरुवात करण्यात आली.

40 अर्ज वैद्य, 2 अर्ज अवैध

या छानणीत 40 अर्ज वैध ठरले आहेत, तर 2 अर्ज अवैध ठरले आहेत. यातील डमी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.