सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा

 

सावंतवाडी

 

      सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा)चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली प्राथमिकता सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करणे हीच असेल. गरज पडल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
        “हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आहे. केवळ आश्वासन नकोत, प्रत्यक्ष काम हव. गरज पडल्यास ‘रेल रोको’सारख आंदोलन करून सावंतवाडीचा आवाज दिल्लीपर्यंत नेऊ,” असा ठाम निर्धार मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी व्यक्त केला.
       कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून मळगाव पंचायत समिती उमेदवार पांडुरंग राऊळ यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे.