७ सप्टेंबर रोजी भारतात दिसणार चंद्रग्रहण

मुंबई
भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. 7 सप्टेंबर रोजी म्हणजे रविवारी हे चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. त्यामुळेच मन:शांती, घरातील सुख कायम राहण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे.चंद्रग्रहण चालू होण्याआधी तुळशीचे पान पाण्यात टाकून ठेवा. जेवण, पाण्याला सुरक्षितपणे झाकून ठेवा. घरात देवाचा मंत्रजाप करा. यामुळे ग्रहणामुळे निर्माण होणारी नकारात्मक उर्जा नाहिशी होते. तसेच सकारात्मक उर्जा यायला सुरुवात होते.ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक, भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ग्रहण संपल्यावर लगेच अंघोळ करा. ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडावे. ग्रहण संपल्यानंतर तीळ, तांदुळ, गूळ, कपडे दान करावे. यामुळे ग्रहणामुळे निर्माण झालेला दोष नाहीसा होतो. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घ्या. कात्री, सुई अशा धारधार वस्तूंपासून दूर राहावे.ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडावे. ग्रहण संपल्यानंतर तीळ, तांदुळ, गूळ, कपडे दान करावे. यामुळे ग्रहणामुळे निर्माण झालेला दोष नाहीसा होतो. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घ्या. कात्री, सुई अशा धारधार वस्तूंपासून दूर राहावे. वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.