बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविदयालयात कै. काकासाहेब चमणकर स्मृतीप्रित्यर्थ श्री. जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ऐश्वर्य चमणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी. बी. गोस्वामी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. माजी सभापती मा.श्री.जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बॅ.खर्डेकर श्री ही स्पर्धा गेली २८ वर्षे सातत्याने महाविद्यालय घेत आहे. विदयार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभाग घ्यावा व भविष्यात होणाऱ्या स्पर्धेत राज्य व व देश पातळीवर आपल्या महाविद्यालयाचा विदयार्थी विजेता व्हावा अशा शुभेच्छा माजी सभापती मा.श्री.जयप्रकाश चमणकर यांनी दिल्या. तर महाविदयालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.डी.बी. गोस्वामी यांनी विदयार्थ्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी ओळखली पाहिजेत, आपल्यासाठी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळी दालने खुली आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवा, व्यायामाची आवड निर्माण करा, आपण उद्याचे भारताचे सुजाण नागरीक आहात. यामुळे आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव मोठे करा असे मनोगत व्यक्त केले
या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला मधील डॉ.वैभव शिंदे, बी. के. सी. असोसिएशन उपाध्यक्ष सुरेंद्र खामकर, बी. के. सी. असोसिएशन सचिव संजय पुनाळेकर, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डी. जे. शितोळे, किशोर सोन्सुरकर, एस. एस. पाटील, जिमखाना चेअरमन डॉ.कमलेश कांबळे, ज्यु. विभाग जिमखाना चेअरमन प्रा.विरेंद्र देसाई, सांस्कृतिक महोत्सव चेअरमन प्रा.पी.एम. देसाई, क्रिडा शिक्षक प्रा.वासुदेव गावडे, सौ. अबोली सोन्सुरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
या स्पर्धेसाठी पंच म्हणुन सुधीर हळदणकर, सौरभ वारंग, अमोल तांडेल, हेमंत नाईक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा संचालक प्रा. जे. वाय नाईक यांनी केले तर उपस्थिताचे आभार प्रा. हेमंत गावडे यानी केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.
बॅ. खर्डेकर श्री विजेता स्पर्धक खालीलप्रमाणे -
सिनियर विभाग
१) बॅ.खर्डेकर श्री- मिलरॉय मिंगेल फर्नाडीस- एफ वाय बी.ए
२) व्दितीय क्रमांक- हितेश विश्राम परब -एस वाय बी. कॉम
३) तृतीय क्रमांक- जनार्दन अरुण गिरप- एस वाय बी. कॉम
४) बेस्ट पोझर -ओम राजाराम पवार - एफ वाय बी.ए
ज्युनिअर विभाग
१) बॅ.खर्डेकर श्री- सोहम पेडणेकर- अकरावी
२) व्दितीय क्रमांक- प्रणव विजय दाभोलकर- बारावी
३) तृतीय क्रमांक- निखिल मोर्जे - अकरावी
४) बेस्ट पोझर- प्रणव विजय दाभोलकर- बारावी

konkansamwad 
