कणकवलीत भाजपची संजना राणे बिनविरोध

कणकवलीत भाजपची संजना राणे बिनविरोध

 

कणकवली

     कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्या आहेत. या बिनविरोध निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मोठा जल्लोष केला.

विद्या शिंदे यांचा अर्ज का बाद ठरला?

विद्या शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी हरकत घेतली होती. त्यावेळी विद्या शिंदे यांच्या जन्मनोंदी, आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रात अनेक चुका असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमाप्रमाणे १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्ये असतील असा उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही. विद्या शिंदे यांना तीन अपत्ये आहेत, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.

भाजपचा जल्लोष

या बिनविरोध निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या विभागाचे प्रमुख भाजपा पदाधिकारी संदीप सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवक चे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिवसेना तालुका अध्यक्ष दामू सावंत, हेमंत परुळेकर, परशुराम झगडे, रंजन राणे, राजू हिर्लेकर, डॉक्टर सत्यवान राणे, संदेश सावंत, सुधीर सावंत, प्रज्वल वरदम, सुदाम तेली, दादा भोगले, बंडू साटम, बाबाजी चव्हाण, आनंद साटम, भाई आंबेडकर आदी उपस्थित होते.