वेंगुर्ला येथे विहिरीत पडला कोल्हा; अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात वन विभागाला यश.

वेंगुर्ला.
येथील आडारी-भेंडमळा परिसरात जयराम गावडे नामक व्यक्तीच्या विहिरीत कोल्हा पडला.कोल्हा पडलेल्याची माहिती वेंगुर्ला येथील वन अधिकाऱ्यांना मिळताच कुडाळ वनपरिक्षेत्र ची रेस्क्यु टीम घटनास्थळी पोहोचली.विहीर खोल व जिर्णवस्थेतील असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते तरीही रेस्क्यू टीम ने स्थानिकांच्या मदतीने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढले. तदनंतर वेंगुर्ला पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून सदर कोल्ह्याचे आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार,मठ वनपाल सावळा कांबळे,तुळस वनरक्षक विष्णू नरळे आदी अधिकारी तसेच वाहनचालक राहुल मयेकर उपस्थित असून स्थानिक नागरिक राधाकृष्ण पेडणेकर, हेमंत आडारकर, कौस्तुभ गावडे, वामन पेडणेकर, रमेश नार्वेकर, वसंत पेडणेकर, बाबल गवंडे, अजित पेडणेकर यांच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढले.
संदीप कुंभार यांनी सहकार्य केलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून प्रत्येक वन्यप्राणी यांचे अन्न साखळीतील महत्व वैशिष्ट्यपूर्ण असल्याने अशा बचाव अभियानात नागरिकांनी सहकार्य करण्याचे तसेच अश्या वनक्षेत्रालगत असणाऱ्या विहिरी बंदिस्त करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने केले.