महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे सर्व जागा लढवणार

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे सर्व जागा लढवणार

 

देवगड

 

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली आणि इच्छुक उमेदवार यांची नावे देखील घेण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार

       यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते नंदुशेट घाटे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघ पणे शांततेच्या मार्गाने निवडणूक यंत्रणा राबवावी व यश संपादन करावे असे यावेळी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या असा एकमताने निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला

  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, युवक काँग्रेसचे किरण टेंबूलकर, मनसेचे उपजिल्हाप्रमुख चंदन मेस्त्री आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या विजयाची तयारी

  यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयासाठी एकजुटाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.