जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी जि. प. निवडणूक रिंगणात

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी जि. प. निवडणूक रिंगणात

 

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सुपूर्द केला. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, भाजपचे पदाधिकारी प्रशांत प्रभूखानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून अर्जांच्या विक्रीला वेग आला आहे.