आजगाव येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक

आजगाव येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक

 

सावंतवाडी

 

    आजगाव येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज दीड वाजण्याच्या सुमारास वाघबीळ नजीकच्या वळणावर  सावंतवाडी-शिरोडा महामार्गावर घडली. जखमींना अधिक उपचारासाठी मिळेल त्या वाहनाने मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.एका बस चालकाची स्थिती गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी मध्ये नेण्यात आले आहे. वेंगुर्ला येथून शिरोडा मार्गे पणजी जाणारी बस आणि सावंतवाडी मधून शिरोड्याकडे येणाऱ्या बसमध्ये हा अपघात घडला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवांडकर, अशोक रेवांडकर, गणेश रेवांडकर, आनंद कळसुलकर, शुभम पर्व, सूर्य पांढरे, सुनील आजगावकर यांसह ग्रामस्थांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. मुसळधार पाऊस असतानाही स्थानिकांनी जखमींना रिक्षा तसेच मिळेल त्या वाहनातून उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात आणि शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.