एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेत रा. कृ. पाटकर हायस्कूलचे यश

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेत रा. कृ. पाटकर हायस्कूलचे यश

 

वेंगुर्ला

 

   वेंगुर्ला येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलचे विद्यार्थी नुकत्याच झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत. विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेत सोहम नितीन पवार ए श्रेणीत तर हिमांशू प्रदीप बागायतकर, हर्ष संजय पिळणकर, रितिका राजेंद्र कांबळी, दिशा महेश गावकर, निशा शामसुंदर म्हारव या विद्यार्थ्यांनी बी श्रेणी प्राप्त केली. या परीक्षेत एकूण २९ विद्यार्थ्यापैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

इंटरमिजिएट परीक्षेतही यश

इंटरमिजिएट परीक्षेमध्ये सर्वेश विकास मेस्त्री ए श्रेणीत तर प्रांजल अभिजीत माडकर, गार्गी रावजी गिरप, वरदा सुशांत वेंगुर्लेकर, दिव्या महादेव पाटील, हर्षाली नारायण वेंगुर्लेकर, मृण्मयी जगन्नाथ आरोलकर, वैभवी शैलेंद्र गोवेकर, रुचिका प्रमोद गिरप या विद्यार्थ्यांनी बी प्राप्त केली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना एस. जे. पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस. आर. धुरी यांनी अभिनंदन केले तसेच, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांस कडून अभिनंदन करण्यात आले.