स्वच्छ वेंगुर्ला दौड २५ मे ऐवजी ५ जून रोजी होणार......ऑरेंज अलर्ट मुळे वेंगुर्ला नगरपरिषदेकडून जाहीर

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने रविवार, दिनांक २५ मे २०२५ रोजी संपन्न होणारी ‘’स्वच्छ वेंगुर्ला दौड’’ ऑरेंज अलर्ट मुळे पुढे ढकलण्यात येत असुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता ‘’स्वच्छ वेंगुर्ला दौड’’ आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे.