सहाव्या दिवशीही डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे ओरोस येथे आंदोलन सुरुच; शिवसेना ठाकरे गटाने दिला आंदोलनास पाठिंबा.
सिंधुदुर्ग.
सहाव्या दिवशीही आंदोलन करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन करत डिएड बेरोजगार संघर्ष समितीने लक्ष वेधले असून सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब यांनी आंदोलन स्थळी भेट देत व्यथा जाणून घेतल्या तसेच शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. रिक्त शिक्षक पदी स्थानिकांची भरती करावी या मागणीसाठी डिएड, बीएड बेरोजगार संघर्ष समितीने आंदोलन सुरुच ठेवले आहे. येत्या दोन दिवसांत काहीही हालचाल प्रशासनाने न केल्यास बेमुदत आमरण उपोषण करणार जो पर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी सांगितले आहे.