कणकवलीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
कणकवली
कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवार मैदानात आहेत.
जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांची संख्या
- हरकुळ बुद्रुक: ९
- कलमठ: ४
- कळसुली: ४
- नाटळ: ४
- खारेपाटण: ३
- कासार्डे: ३
- जानवली: ३
- फोंडाघाट: ७
पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांची संख्या
- खारेपाटण: ५
- तळेरे: ३
- कासार्डे: ३
- नांदगाव: ३
- जानवली: ३
- बीडवाडी: २
- फोंडाघाट: ४
- लोरे: ४
- हरकुळ खुर्द: ३
- हरकुळ बु.: ४
- वरवडे: ३
- कलमठ: ४
- कळसुली: ४
- ओसरगाव: ४
- नाटळ: १
- नरडवे: १
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

konkansamwad 
