वेंगुर्ला तालुक्यात ९८ उमेदवारी अर्ज वैध.....जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक....रेडी गणातून एकच अर्ज अवैध
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. या छाननीत जिल्हा परिषद गटातील सादर झालेले सर्व ३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले, तर पंचायत समिती गणातील ६२ उमेदवारी अर्जांपैकी केवळ एकच अर्ज अवैध ठरला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. वेंगुर्ला तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात सकाळी ११ वाजता ही छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी उपस्थित होते. एकूण ८२ उमेदवारांनी सादर केलेल्या ९९ उमेदवारी अर्जांपैकी पंचायत समितीच्या रेडी गणातून अपक्ष उमेदवार सानिया भोसले यांचा एकच अर्ज अवैध ठरला. मात्र, जिल्हा परिषद गटातून त्यांनी सादर केलेला उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्हा परिषद गट – वैध उमेदवार
तुळस – सर्वसाधारण महिला
सुजाता पडवळ (अपक्ष),
अदिती नाईक (अपक्ष),
पल्लवी आरमारकर (उद्धव शिवसेना),
योगिता परब (शिंदे शिवसेना)
म्हापण – सर्वसाधारण महिला
वंदना किनळेकर (अपक्ष),
प्रतिक्षा पाटकर (उद्धव शिवसेना),
प्रणिती आंबडपालकर (अपक्ष),
यज्ञा साळगांवकर (शिंदे शिवसेना)
उभादांडा – सर्वसाधारण
संजय गावडे (उद्धव शिवसेना),
मनवेल फर्नाडिस (भाजप)
आडेली – सर्वसाधारण
मनिष दळवी (भाजप),
ओंकार नाईक (अपक्ष),
नित्यानंद शेणई (अपक्ष),
समिधा नाईक (अपक्ष),
जनार्दन कुडाळकर (अपक्ष),
विजय नाईक (उद्धव शिवसेना),
ललितकुमार ठाकूर (काँग्रेस),
सखाराम सारंग (राष्ट्रवादी शरद पवार गट),
आपा गावडे (अपक्ष),
विष्णू खानोलकर (अपक्ष)
रेडी – सर्वसाधारण
चंद्रहास पांडजी (अपक्ष),
उत्तम चव्हाण (अपक्ष),
किरण पालयेकर (अपक्ष),
नामदेव राणे (उद्धव शिवसेना),
काशिनाथ नार्वेकर (अपक्ष),
प्रितेश राऊळ (भाजप),
सानिया भोसले (अपक्ष),
सिद्धेश परब (अपक्ष),
प्रथमेश परब (राष्ट्रीय काँग्रेस)
पंचायत समिती – वैध उमेदवार
तुळस – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
सुचिता वजराठकर (शिंदे शिवसेना),
अमृता साळगांवकर (अपक्ष),
नयना धुरी (अपक्ष),
सुप्रिया मेस्त्री (अपक्ष)
मातोंड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
विशाल बागायतकर (राष्ट्रवादी शरद पवार गट),
संदीप पेडणेकर (अपक्ष),
रमाकांत कोंडये (उद्धव शिवसेना),
शंकर घारे (भाजप),
विजय रेडकर (अपक्ष)
रेडी – सर्वसाधारण महिला
प्रियांका घाटवळ (भाजप),
वंदना कांबळी (उद्धव शिवसेना)
शिरोडा – सर्वसाधारण महिला
शीतल साळगांवकर (शिंदे शिवसेना),
सुमती मसुरकर (अपक्ष),
हर्षा परब (अपक्ष),
समृद्धी कुडव (उद्धव शिवसेना)
उभादांडा – सर्वसाधारण महिला
साक्षी नार्वेकर (शिंदे शिवसेना),
गंधाली तांडेल (उद्धव शिवसेना)
आसोली – सर्वसाधारण
सुनील मोरजकर (अपक्ष),
संजय गावडे (अपक्ष),
संकेत धुरी (भाजप)
आडेली – सर्वसाधारण
गुणाजी राऊळ (अपक्ष),
सुभाष बोवलेकर (अपक्ष),
अविनाश तोरसकर (अपक्ष),
जनार्दन कुडाळकर (अपक्ष),
समिधा कुडाळकर (अपक्ष),
नित्यानंद शेणई (उद्धव शिवसेना),
उमेश नाईक (शिंदे शिवसेना),
मितेश परब (अपक्ष),
नितीन मांजरेकर (अपक्ष)
वायंगणी – सर्वसाधारण महिला
कृतिका माडकर (उद्धव शिवसेना),
मनस्वी साळगांवकर (अपक्ष),
शीतल राऊत (भाजप),
यशश्री नाईक (अपक्ष),
संतोषी गावडे (अपक्ष)
म्हापण – सर्वसाधारण
गुरुनाथ मडवळ (अपक्ष),
विश्वनाथ म्हापणकर (अपक्ष),
निकीत राऊळ (अपक्ष),
सचिन देसाई (शिंदे शिवसेना),
अशोक पाटकर (उद्धव शिवसेना),
अवधूत रेगे (राष्ट्रवादी शरद पवार गट),
विष्णू फणसेकर (भाजप),
प्रशांती कोनकर (अपक्ष)
परुळे – सर्वसाधारण
संकेत केळुसकर (अपक्ष),
वासुदेव माधव (उद्धव शिवसेना),
घनश्याम सामंत (भाजप/अपक्ष),
मनोहर येरम (अपक्ष),
अवधूत रेगे (राष्ट्रवादी शरद पवार गट),
तेजस भगत (अपक्ष),
सचिन देसाई (शिंदे शिवसेना),
प्रसाद पाटकर (अपक्ष)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

konkansamwad 
