परुळे येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

वेंगुर्ला.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाश्र्वभूमीवर महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ परुळे मतदार संघातील घरोघरी प्रचाराचा शुभारंभ आज रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी श्री देव वेतोबा मंदिर परुळे येथे श्रीफळं ठेवून करण्यात आला.
यावेळी माजी सभापती निलेश सामंत,भोगवे माजी सरपंच महेश सामंत शिवसेना उपजिल्हाप्रमुखं सचिन देसाई,सरपंच निलेश सामंत,भोगवे सरपंच रुपेश मुंडये,परुळे माजी सरपंच प्रदीप प्रभू,माजी सरपंच भोगवे संजय सामंत, चेअरमन चेतन सामंत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे,सुनील चव्हाण, संदेश पवार, आबा मांडये कुशेवाडा उपसरपंच महादेव साफळे प्रकाश राणे,गणपत माधव, भरत परब, बाळा माडये भानू राणे, दामू साळगावकर, बाळा राऊळ,यासह महायुती चे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे याना मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्ते यानी केला.