वेळागर येथे समुद्रात ८ जण बुडाले...... बेळगांव येथील कुटुंबावर काळाचा घाला

वेळागर येथे समुद्रात ८ जण बुडाले...... बेळगांव येथील कुटुंबावर काळाचा घाला

 

शिरोडा


 

     शिरोडा वेळागर समुद्रकिनारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुडाळ पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेले मणियार कुटुंबातील ८ सदस्य समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले. यातील ३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तसेच एका लहान मुलीचे प्राणदेखील वाचविण्यात यश आले असून तिला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ जण अजून बेपत्ता असून बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे. माहितीनुसार हे चारही जण पुरुष असल्याचे समजते. यामध्ये २ तरुण आणि  २ लहान मुलगे आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्या ४ जणांना शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. यावेळी मणियार कुटुंबातील बाकीचे सदस्य क्षणात कोसळलेल्या या दुःखाचा सामना करत आहेत.