अणसूर पाल हायस्कूल येथे उद्या संगीत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

अणसूर पाल हायस्कूल येथे उद्या संगीत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

 

अणसूर

 

     अणसूर पाल विकास मंडळ मुंबई व गुरुकुल संगीत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूर पाल हायस्कूल, अणसूर येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत गायन-वादनाचे शास्त्रोक्त मोफत प्रशिक्षण वर्ग शनिवारी दिनांक ३ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे.या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या सकाळी ९.३० वाजता शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच सौ.कावेरी गावडे, शालेय समिती सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे व गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक आनंद माळकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या प्रशिक्षण वर्गात शाळेतील विद्यार्थ्यांना, गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विशारद हर्षल मेस्त्री प्रशिक्षण देणार आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी या उद्घाटनप्रसंगी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष गोविंद गावडे, संस्था सचिव लिलाधर गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ व गुरुकुल संगीत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.