परुळे नं ३ शाळेत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न.

परुळे नं ३ शाळेत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला.

  तालुक्यातील परुळे येथील जिल्हा परिषद शाळा परुळे नंबर ३ शाळेत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधत विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व विशद करीत मार्गदर्शन केले.शेवटी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या काही प्रमाणात पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
   यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक प्रविण दाभोलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, शालीक पाटिल, अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ यांसह पालकवर्ग उपस्थित होते.