सिंधुदुर्गातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी !

सिंधुदुर्ग
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार बांधवांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरांचे ठिकाण व वेळापत्रक
८ ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, देवगड
१० ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, मालवण
१४ ऑक्टोबर – ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला
वेळ : सकाळी १० ते सायं. ५
या शिबिरांमध्ये मच्छीमारांना विविध आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत मिळणार आहेत!
“जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी या आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घ्या.” असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.