रत्नागिरी व सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिली परुळेबजार ग्रामपंचायतीला भेट. विविध स्वच्छ्ता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक.

रत्नागिरी व सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिली परुळेबजार ग्रामपंचायतीला भेट.  विविध स्वच्छ्ता विषयक उपक्रमांची माहिती घेत केले कौतुक.

वेंगुर्ला.

   ग्रामपंचायत नाचणे जिल्हा रत्नागीरी व ग्रामपंचायत वांगी जिल्हा सांगलीच्या टिमने अभ्यास दौऱ्याअंतर्गत दिली परुळे बाजार ग्रामपंचायतीस भेट विविध उपक्रमांची पाहणी केली.या अभ्यास दौऱ्यांतर्गत या दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत परुळेबाजार येथे भेट दिली.
   यावेळी परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, स्वच्छतादूत प्रेमा जाधव, ग्रामसेवक शरद शिंदे उपस्थित होते.
   यावेळी दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी परुळेबाजार अंगणवाडी, व्यायामशाळा, काथ्या प्रकल्प, प्लॅस्टीक संकलन व प्रक्रिया, युनीट सांडपाणी पुर्नवापर युनिट यांची पाहणी केली. यावेळी दिल्ली येथे स्वच्छतादूत म्हणून सन्मान झालेल्या प्रेमा जाधव यांचा ग्रामपंचायत वांगी जिल्हा सांगली च्या पदाधिकान्यांनी त्यांचा सत्कार केला, तसेच ग्रामपंचायत नाचणे ग्जिल्हा रत्नागिरी यांनीही प्रेमा जाधव यांच्याशी बातचीत करून त्यांचा कामाचा गौरव केला.तसेच ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतूक केले.