नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणा ही प्रत्येक भारतीयासाठी दिवाळी भेट - गोवा मुख्यमंत्री

पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणा आणल्याबद्दल स्वागत केले आणि त्यांना प्रत्येक भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवाळी भेट असे संबोधले. पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशा निर्णायक उपाययोजना म्हणून वर्णन केले जे कुटुंबीय, शेतकरी आणि देशभरातील व्यवसायांसाठी फायदेशीर ठरतील. डॉ. सावंत यांनी सांगितले की, नवीन जीएसटी संरचना ज्यामध्ये चार कर दराऐवजी फक्त ५% आणि १८% आहेत. जे थेट गरीब कुटुंबांना, शेतकरी आणि लहान व्यवसायांसाठी फायदेशीर ठरेल. अन्नधान्ये व औषधे अधिक स्वस्त होतील. आरोग्य सेवा, आरोग्य व जीवन विमा तसेच ऑक्सिजन, थर्मामीटर आणि डायग्नोस्टिक किटसारखी आवश्यक वैद्यकीय उपकरणे सूट किंवा कमी दरात ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे घरांसाठी मोठा आराम मिळेल. शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल, जसे की ट्रॅक्टर, टायर आणि ड्रिप सिंचन उपकरणांवरील जीएसटी ५% करण्यात आली आहे. वाहन क्षेत्रात, हायब्रिड कार, मोटारसायकल आणि तीनचाकीवर जीएसटी २८% पासून १८% वर आणले आहे. शिक्षण क्षेत्राला विशेष लक्ष देण्यात आले असून नोटबुक आणि स्टेशनरीवर सूट आहे, तसेच विमा क्षेत्रालाही सवलत देण्यात आली आहे.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणलेल्या सुधारणा कर प्रणाली सोपी आणि सर्वसमावेशक बनवण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. घरांपासून शेतकरी आणि उद्योगांपर्यंत प्रत्येक समाजाच्या घटकांना फायदा होईल. गोव्यात जीएसटी अंतर्गत आधीच सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. २०१७ मध्ये राज्यात २२,१९७ करदाते होते. जुलै २०२५ पर्यंत हा आकडा ४७,२३२ वर पोहोचला असून ११२ टक्के वाढ दर्शवतो. राज्याची महसूल उभारणी २०१८–१९ मध्ये ₹२,५२९ कोटींपासून २०२४–२५ मध्ये ₹४,४२४ कोटी झाली आहे, म्हणजे ७४ टक्के वाढ. या सुधारणा या सकारात्मक प्रवाहास आणखी बळकटी देतील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले असून मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जीएसटी कॉन्सिलमधील सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी ही ऐतिहासिक नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणा आणली. जीएसटी मधील या सुधारणा छोटी कुटुंबे, शेतकरी तसेच व्यावसायिक यांना अधिक लाभ तर देतीलच शिवाय हे विकसित भारत २०४७ साठी एक महत्वाचे पाऊल देखील ठरले आहे असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.