सावंतवाडी प्रभाग क्र. ७ मध्ये आर्या सुभेदार यांची प्रचारात आघाडी
सावंतवाडी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये महिला उमेदवारांमध्ये सौ. आर्या सुभेदार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्या सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत असून त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सौ. सुभेदार या प्रभागासाठी एक नवीन युवा चेहरा आहे. मात्र मागील पंधरा वर्षांपासून त्यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये असलेला जनसंपर्क आणि जनतेशी असलेली मजबूत नाळ पाहता, त्यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. डोअर टू डोअर प्रचार करत असताना सौ. सुभेदार यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

konkansamwad 
