लांजा तालुक्यात सापडला २३ कातळशिल्पांचा खजिना.

लांजा तालुक्यात सापडला २३ कातळशिल्पांचा खजिना.

रत्नागिरी.

   लांजा तालुक्यात वीरगाव येथे २३ कातळशिल्पे शोधण्यात विद्यार्थी संशोधक आणि स्थानिक युवक यांना यश आले आहे.
   तालुक्यातील वीरगाव पिंपळ बाऊल येथे मिलनाथ पातेरे, सुचित्रा चौधरी आणि वेद वरशिनी यांनी संदेश वीर योगेश पातेरे या स्थानिक युवकांच्या मदतीने जलचर, भूचर, पक्षी मानवाकृती, चित्रे, प्राणी यांची शिल्पे कोरलेली आढळून आली आहेत. नव्याने आढळून आलेल्या या शिल्पांमधील  काही शिल्पे ही अडीच मीटर लांबीची आहेत. मिलनाथ पातेरे यांनी डेक्कन येथे शिक्षण पूर्ण केले आहे. कोकणातील कातळशिल्पे यावर त्याच्या टीमचा अभ्यास सुरु आहे.
   रत्नागिरी येथील सुधीर रिसबूड यांच्याशी संपर्क साधून या टीमने लांजा तालुक्यात कातळ शिल्पावर अभ्यास सुरु केला आहे. वीरगाव पिंपळ येथील या शिल्पांबाबत  स्थानिक पातळीवर श्रद्धा परंपरा जपली जात आहे.