शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ४ ते ११ ऑगस्ट रोजी भगवा सप्ताह.

वेंगुर्ला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा सप्ताह ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भगवा सप्ताह घेण्यासंदर्भात नियोजनाची बैठक वेंगुर्ला तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे संपन्न झाली. या सप्ताह मध्ये सभासद नोंदणी करणे, प्रत्येक मतदान केंद्राच्या केंद्रनिहाय कार्यकर्ते व पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेणे, तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेले मतदान व संघटनेतील शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांचे निराकरण करणे अशा पद्धतीने भगवा सप्ताह साजरा करून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करण्यात आला.यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदार संघ, वेंगुर्ला शहर यामध्ये खालील प्रमाणे भगव्या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये आडेली जिल्हा परिषद मतदार संघात 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट, रेडी जिल्हा परिषद मतदार संघात 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट तुळस जिल्हा परिषद मतदार संघात 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघात 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, वेंगुर्ला शहर 7 ते 9 ऑगस्ट असे नियोजन करण्यात आले आहे.
या नियोजनासाठी महिला जिल्हा प्रमुख सुकन्या नरसूले, तालुकाध्यक्ष यशवंत (बाळू) परब, शहराध्यक्ष अजित राऊळ अस्मिता राऊळ, सुधाकर राऊळ, कर्मिस आल्मेडा, तुकाराम परब, संदीप पेडणेकर, प्रशांत गावडे, रफिक बे, अर्जुन गावडे, उमेश नाईक कोमल सरमळकर, अनंत गोंधळेकर, उदय गोवेकर, अनिल मांजरेकर, दाजी गोलतकर, संदीप केळजी, डेलीन डिसोजा, नामदेव राणे, गोविंद परब, संजय गावडे, शमिका मठकर, वसंत साटम, बापू अमरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.