मराठी रंगभूमी दिवस: कलाभक्तीची सुवर्ण परंपरा
कला ही जगायला शिकवते, रंगभूमी ही कलाकार जगवते.मराठी रंगभूमी ही केवळ नाटक, संवाद, रंगमंच व प्रकाशझोतापुरती मर्यादित नाही; ती आपल्या संस्कृतीची ओळख, समाजाच्या संवेदनशीलतेचा आरसा आणि विचारांच प्रवाहस्थान आहे. मराठी रंगभूमी दिवस साजरा करण म्हणजे त्या अवघ्या परंपरेला, त्या कलाकारांना आणि त्या जिवंत अभंग प्रवाहाला वंदन करण्यासारख आहे.
रंगभूमीचा प्रवास एका अद्भुत ध्येयातून सुरू झाला. लोकांना जाग करण, समाजाला विचार करायला लावण आणि जीवनाला नवा अर्थ देणं. ५ नोव्हेंबर १८५३ रोजी ‘सीता स्वयंवर’ हे पहिल मराठी नाटक प्रसिद्ध झाल आणि त्या दिवसापासून मराठी रंगभूमीचा सुवर्ण प्रवास सुरू झाला. आजचा दिवस म्हणूनच या कलाप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान मिळवतो.
नाट्यप्रकार हा लोकमानसांवर थेट परिणाम करणारा आहे. मराठी रंगभूमीने आपल्या समाजाला अनेक विचारवंत, कवी, लेखक, विनोदी कलाकार आणि चरित्रनायक दिले. विष्णुदास भावे, बाल गंधर्व, आनंदराव काढवे, केशवराव दाते, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, गदिमापासून ते आजच्या आधुनिक रंगकर्म्यांपर्यंत ही परंपरा अखंड चालू आहे. प्रत्येक काळाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना रंगभूमीने आपल्या कलादृष्टीने उजाळा दिला आहे.
रंगमंचावर घडणार प्रत्येक नाटक म्हणजे सामूहिक साधना. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, वेशभूषाकार, संगीतकार, हालकर्स, व तंत्रज्ञ सगळे मिळून जसं एकत्र होतात, तसंच पाहणाऱ्यांच्या मनात एक नवा विचार अंकुरतो. हाच मराठी रंगभूमीचा चमत्कार आहे. ती खूप जवळची वाटते कारण तिच्यात आपलं आयुष्य, आपली शहरे, आपली भाषा, आपली वेदना आणि स्वप्नं प्रतिबिंबित होतात.
मराठी रंगभूमी दिवस हा फक्त एक सण नाही तर ती एक स्मृती आहे. त्या रंगकर्म्यांच्या परिश्रमांची, जिद्दीची आणि समर्पणाची. नवीन पिढीने या परंपरेचा वारसा जपताना तंत्रज्ञान, प्रकाशयोजना आणि संगीताच्या आधुनिकीकरणाशी जोडून अधिक परिणामकारक सादरीकरणाची दिशा घ्यावी, हीच या दिवसाची खरी शिकवण.
आजही रंगमंचावर पडदा उघडताना मनात एक आश्चर्य दाटून येत, त्या प्रकाशात माणसाच जीवन उमलत, दुःख विरत, हसण उगवत. मराठी रंगभूमी ही म्हणजे महाराष्ट्राचं जिवंत हृदय, जे प्रत्येक आवाजासोबत धडधडतं, प्रत्येक संवादात स्पंदत आणि प्रत्येक टाळीबरोबर हसत.या दिवशी आपण म्हणूनच प्रणाम करतो त्या रंगभूमीला, ज्यामुळे आपल्यातील कलाभाव जागा राहतो आणि मन माणुसकीच्या रंगांनी पुन्हा पुन्हा उजळत.

konkansamwad 
