सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.

सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड, स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीचे विधिवत पुजन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, किशोर काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांचेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.