ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी पाण्याची सोय

सावंतवाडी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आयजीयुस इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात एकूण ४ महाविद्यालये व १५ शाळांना पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणा प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण ९५ विद्यार्थी, ४ महाविद्यालय आणि १५ शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी, तहसीलदार श्रीधर पाटील, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक, बँक ऑफ इंडिया लीड बँक मॅनेजर ऋषिकेश गावडे, एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र शिंत्रे, कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल तसेच कोकण संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षणाधिकारी यांनी आपल्या भाषणात कोकण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले, ते बोलले अशा संस्थांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी नितांत गरज आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी अनेक संस्थांना एकत्र आणून कोकण संस्था सिंधुदुर्गाच्या विकासात देत असलेल्या योगदानाबद्दल संस्थेचे आभार मानले त्याचबरोबर भविष्यात संस्थेसोबत काम करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक यांनी आयजीयुस इंडिया कंपनीचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्यावतीने मुंबई कार्यालयातून सीएसआर हेड प्रीती पांगे, सुरज कदम, साक्षी पोटे, हर्षला कोल्हे, सिंड्रेला जोसेफ, बिना अहिरे, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत, अमित पाटील, अवंती धुरी, हनुमंत गवस, स्वाती मांजरेकर, समीर शिर्के, अमोल गुराम, प्रदीप पवार, गौरी आडेलकर, वैष्णवी म्हाडगुत, फेमिना डान्टस यांनी योगदान दिले.