दाणोली तलाठी सचिन चितारे यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्कार.

दाणोली तलाठी सचिन चितारे यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्कार.

सावंतवाडी.

   महसूल विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल सावंतवाडी तालुक्यातील दाणोली सजाचे तलाठी सचिन चितारे यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चितारे यांनी सन २०२२ -२३ या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टाप्रमाणे ई फेरफार, ई पिक पाहणी, ई चावडी, कृषी गणना या ऑनलाइन प्रणालीमध्ये उत्कृष्टपणे काम करून शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल त्यांची उत्कृष्ट तलाठी या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. सिंधुदुर्ग नगरीतील पोलीस ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक अग्रवाल आणि सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महसूल खात्याचा हा मानाचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल तलाठी सचिन चितारे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.