परुळे येथे वाचनप्रेरणा दिन साजरा.......उत्तम वाचक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले कौशल्य
परुळे
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त परुळे येथील ग्रंथालयात वाचनप्रेरणा दिन साजरा करण्यात आला. ग्रंथप्रदर्शनासह आयोजित उत्तम वाचक स्पर्धेत लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी आपली निपुणता प्रदर्शित केली.
स्थानिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जि.प. शाळा परुळे न. ३ च्या विद्यार्थिनींनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात आरोग्य, इतिहास, बालवाडमय इत्यादी विषयांच्या पुस्तकांची मांडणी करण्यात आली. बालवाचकांनी आपली नोंद करून ग्रंथालयाचे बाल सभासदत्व मिळवले.
उत्तम वाचक स्पर्धा निकाल
मोठा गट (इयत्ता ५ वी – ७ वी)
प्रथम क्रमांक: अंजली नागेश वरक
द्वितीय क्रमांक: शुभम मिलिंद परुळेकर
तृतीय क्रमांक: स्पृहा संतोष मेस्त्री
लहान गट (इयत्ता १ ली – ४ थी)
प्रथम क्रमांक: पुष्कर सुशिल उतेकर
द्वितीय क्रमांक: लक्ष निलेश नानचे
तृतीय क्रमांक: गौरी समीर तुळसकर
कार्यक्रमास खजिनदार सुनिल माड्ये, प्रथमेश नाईक, कर्मचारी श्री.आमडोसकर तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालय प्रशासनाने सांगितले की, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन सुरु राहील.

konkansamwad 
