मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला घाडीवाडा येथील श्री देव वेतोबाचे घेतले दर्शन

मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला घाडीवाडा येथील श्री देव वेतोबाचे घेतले दर्शन

 

वेंगुर्ले

 

       वेंगुर्ले घाडीवाडा येथील प्रसिद्ध श्री वेतोबा देवाच्या जत्रोत्सवानिमित्त राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन देवाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री सातेरी देवीचे दर्शन घेऊन वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत उभे असलेल्या भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा असे साकडे घातले.
       यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. आकांक्षा परब, सौ. गौरी माइणकर, सौ. यशस्वी नाईक, युवराज जाधव, प्रीतम सावंत, माजी नगरसेवक दाजी परब तसेच रुपेश पावसकर, वसंत तांडेल, हेमंत गावडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.