ग्रामपंचायत पेंडूर येथील आरोग्य शिबिरात ३६१ जणांची तपासणी

ग्रामपंचायत पेंडूर येथील आरोग्य शिबिरात ३६१ जणांची तपासणी

 

वेंगुर्ले

 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचारतराज अभियान अंतर्गत  ग्रामपंचायत पेंडूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिर व  मोफत नेत्र  तपासणी शिबीरास पेंडूर गावातील एकुण 361 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरपंच संतोष गावडे, भाजपचे सदस्य बाळू प्रभू, MSRT कला क्रिडा मंडळ तुळसचे सेक्रेटरी तथा माजी सरपंच विजय रेडकर, उपसरपंच समिक्षा तांडेल, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, दिपक कवठणकर, निलेश नाईक, प्रणिता सावंत, सुहासिनी वैद्य, सुलोचना परब, रंजना हर्जी, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच पेंडूर येथील सर्व शासकीय कर्मचारी, शाळा, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील, CRP, तंटामुक्त अध्यक्ष उमेश सावंत आदी उपस्थित होते.