वेंगुर्ला येथील समुद्रात बुडालेल्या त्या खलाशांचे शोधकार्य सुरू; भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल.

वेंगुर्ला येथील समुद्रात बुडालेल्या त्या खलाशांचे शोधकार्य सुरू; भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल.

वेंगुर्ला.

    वेंगुर्ला बंदरात बोट उलटल्याची घटना रात्री घडली आहे. बोट उलटल्यामुळे सात खलाशी बुडाले होते. त्यापैकी तीन खलाशांनी पोहून किनारा गाठला, त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. यापैकी चार खलाशी बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली. तेव्हा त्यातील एका खलाशांचा मृतदेह सापडला आहे. तर तीन जण अजूनही बेपत्ता आहेत.
   मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले.त्यातील तीन खलाशी पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र तीन खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. ते पाण्यात बेपत्ता झाले आहेत. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील तर तीन खलाशी हे मध्यप्रदेश येथील असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक जणांचा मृतदेह सापडले आहे.उर्वरित तिघांचा शोधकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.या शोध कार्यामध्ये पोलीस प्रशासन, तहसीलदार, महसूल यंत्रणा, मत्यव्यवसाय विभाग, सागरी सुरक्षा रक्षक, सागर मित्र, मेरोटाईम बोर्ड, कस्टम विभाग, भारतीय तट रक्षक दल, स्थानिक मच्छिमार आदी सहभागी झाले होते.