घरात घुसून अज्ञात चोरट्यांकडून वृद्धेचा खून
मालवण
मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यानी रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर चोरटे घटना स्थळावरून पसार झाले. दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून आता पुढील तपास सुरु आहे.

konkansamwad 
