पथविक्रेत्यांनी पी.एम.स्व निधी योजनेचा लाभ घ्यावा; मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे आवाहन.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला नगरपरिषद प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVNidhi) ही पथविक्रेत्यांसाठी विशेष योजना आहे. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी सूक्ष्म पतपुरवठा केला जातो त्यामध्ये प्रथम टप्पा १००००/- रुपये कर्ज, दुसरा टप्पा २००००/- रुपये कर्ज आणि तिसरा टप्पा ५००००/- हजार रुपये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
वेंगुर्ला नगरपरिषद ने आतापर्यंत बँकांच्या माध्यमातून १०,०००/- रुपये २०५ लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ देण्यात आला. २०,०००/- रुपयाचे ११० लाभार्थ्यांना कर्जाचा लाभ देण्यात आला व ५०,०००/- रुपयाची २९ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे.
वेंगुर्ला शहरातील ज्या पथविक्रेत्यांना कर्ज प्रस्ताव करायचा आहे त्याने वेंगुर्ला नगरपरिषद DAY-NULM कक्षाशी संपर्क करावा.(श्री. विलास ठुंबरे सहायक प्रकल्प अधिकारी संपर्क क्रमांक – 9422870682) या नंबर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.