मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात

मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात

 

बांदा

 

       मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे भरधाव वेगात टेम्पो ट्रॅव्हलरची कारला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यात ट्रॅव्हलर मधील महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
  अपघातातील जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी प्राथमिक उपकार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात पाठविले. या अपघातात एकूण २० जण जखमी असून पाच जण गंभीर जखमी झाल्या आहेत. पैकी काही जणांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.