वेंगुर्ला येथे भाजपाच्या वतीने तिरंगा झेंड्याचे वाटप.

वेंगुर्ला येथे भाजपाच्या वतीने तिरंगा झेंड्याचे वाटप.

वेंगुर्ला.

   सतत दुसर्‍या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त " हर घर तिरंगा " उपक्रमा अंतर्गत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले एस् टी डेपोतील चालक, वाहक व वर्कशॉप कर्मचारी तसेच रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले .
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले. पुर्वी तिरंगा ध्वज फक्त शासकीय इमारतीवर लावता येत असे परंतु २०२२ मध्ये ध्वजसंहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्याना हा अधिकार मिळाला .त्यामुळेच प्रत्येक घरात तिरंगा फडकविण्यात येतो.भारतीय ध्वजसंहितेच्या कलम २.१ नुसार प्रत्येक व्यक्तीस तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आज आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये देशभावना जाग्रृत करण्यासाठीच " घर घर तिरंगा " हे अभियान असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
 वेंगुर्ले एस् टी आगारात तिरंग्याचे वितरण- 
    भाजपा पक्षाशी संलग्न असलेली " सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटना " पदाधिकाऱ्यांना सोबत घेत वेंगुर्ले आगारात चालक, वाहक व वर्कशॉप कामगार यांना तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आले.
    यावेळी आगार सचिव दाजी तळवणेकर, विभागीय उपाध्यक्ष भरत चव्हाण, वेंगुर्ले स्टॅन्ड इनचार्ज निलेश वारंग, वाहतूक नियंत्रक लालसिंग पवार व हरेश पाटकर, सुरक्षा रक्षक धुरी, तेजस जोशी, संजय झोरे, अंकुश केरकर, राजेश तांडेल, सत्यवान परब ,रामचंद्र पालकर तसेच वर्कशॉप कर्मचारी आईर, बेग, चव्हाण, तेंडुलकर, पेडणेकर व कुडव उपस्थित होते.

 रिक्षा व्यवसायीकांना तिरंगा वाटप -
   वेंगुर्ले शहरातील रामेश्वर मंदिर रीक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा व्यवसायीकांनाही तिरंगा झेंडा देण्यात आले.यावेळेस रिक्षा व्यवसायीक भोले परब, बाळु कुबल, शंकर सावंत, दादा नवार, रवि राऊळ, मोहन कुर्ले, भावेश परब इत्यादी उपस्थित होते  .
   या झेंडा वितरणावेळी ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , युवा मोर्चाचे हेमंत गावडे, सुनील मठकर इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.