इन्सुली -रमाईनगर समाज मंदिरात संविधान दिन साजरा
इन्सुली
भिमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्यावतीने प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली येथे संविधान दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी, सचिव अरविंद जाधव, सल्लागार राघोबा जाधव, दिपक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राघोबा जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास व वृषाली जाधव यांच्या हस्ते विचार मंचावरील भगवान बुध्दांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दिप आणि धूप प्रज्वलन करून झाली. त्याचप्रमाणे संविधानाच्या प्रतिकृतीचे सविता जाधव व संजना जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांमधील कुमारी सपना जाधव, सेजल जाधव, संजना जाधव व सिध्देश जाधव आणि सल्लागार राघोबा जाधव यांनी आपल्या मनोगतात संविधानाविषयी माहिती सांगताना संविधानामुळे आपणास मिळालेले हक्क व अधिकाराबरोबर कर्तव्यांची जाणीव करुन देऊन प्रत्येकाने संविधानाचे पालन केले तरच संविधानाच्या मूल्यांची जपणूक होऊन ती तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल आणि भारतीय लोकशाहीची मुळे खोलवर रोवली जातील, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना धम्मचारी लोकदर्शी यांनी सर्व राष्ट्रांमध्ये भारतीय संविधान श्रेष्ठ असल्याचे सांगितले. प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पावित्र्य ठेवून ही मूल्ये टिकण्यासाठी आपल्यावर किंवा इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्र आवाज उठवून संविधानिक लढा दिला तरच संविधानाची अंमलबजावणी होवून लोकशाही टिकून राहू शकेल असे प्रांजळपणे व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बाबली जाधव, मिथिल जाधव, दिपेश जाधव, तेजस जाधव, स्मिता जाधव, अनुजा जाधव, अनघा जाधव, कृतिका जाधव, सृष्टी जाधव, सानिका जाधव, सुप्रिया जाधव, ललिता जाधव, संपदा जाधव, मनिषा जाधव, लक्ष्मी जाधव, दिपाली जाधव, लैला जाधव, अनुसया जाधव इत्यादी रमाईनगर येथील बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरविंद जाधव व आभार दिपक जाधव यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

konkansamwad 
