संजय आंग्रे यांच्या हस्ते कणकवलीत रील स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
कणकवली
श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेतील विजेते
- प्रथम क्रमांक सिद्धेश चव्हाण
- द्वितीय क्रमांक अथर्व रेवडेकर
- तृतीय क्रमांक प्रथम जानकर
कार्यक्रमास युवा सेना सिंधुदुर्ग सचिव निलेश मिस्त्री, तालुकाप्रमुख सौरभ सुतार, राज पटेल तसेच मंडळाचे पदाधिकारी, स्पर्धक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय आंग्रे यांनी तरुणाईला कला सादर करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत पुढे सहकार्याचे आश्वासन दिले. समारोप मंडळाच्या वतीने पाहुण्यांचे आभार मानून करण्यात आला.

konkansamwad 
