रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्या अध्यक्षपदी मनस्वी घारे तर सचिवपदी गौरव पारकर.

रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्या अध्यक्षपदी मनस्वी घारे तर  सचिवपदी गौरव पारकर.

देवगड.

  रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी   देवगडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे,यामध्ये अध्यक्ष पदी माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी महेश घारे यांची निवड करण्यातआली आहे. सचिव पदी गौरव पारकर तसेच खजिनदारपदी अनुश्री पारकर यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ मॅगोसिटी देवगडची बोर्ड ऑफ डायरेक्टरची सभा व जॉईन्ड अर्सेम्ब्ली हॉटेल डायमंड येथे घेण्यात आली. त्यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यासोबत व्हॉईस प्रेसिडेंट रो. विजय बांदिवडेकर, सार्जेंट अॅट आर्म रो. अनिल गांधी, एक्झ्युिकेटिव्ह सेक्रेटरी रो. नरेश डामरी, जॉईन्ट ट्रेझर रो. अनिल कोरगावकर, डायरेक्टर ऑफ कम्युनिटी सर्व्हिस रो. दया पाटील, डायरेक्टर ऑफ क्लब सव्र्हिस रो. प्रविण पोकळे, इन्टरनॅशनल सर्व्हिस रो. प्रकाश गायकवाड, डायरेक्टर ऑफ न्यू जनरेशन रो. मनिषा डामरी, डायरेक्टर ऑफ पोलिओ प्लस रो. डॉ. उमेश पाटील, चेअरमन मैमबरशिप रो. सुनिल दत्त पारकर, चेअरमन अॅडमिनिस्ट्रेशन रो. हनिफ मेमन, चेअरमन रोटरी फाऊंडेशन रो. महेश घारे, चेअरमन सर्व्हिस प्रोजेक्ट रो. अशोक मुजुमले, चेअरमन पब्लिक इमेज रो. रमाकांत आचरेकर, चेअरमन क्लब लिट्सी रो. शामल पोकळे, चेअरमन फेलोशीप रो. श्रीपाद पारकर, चेअरमन ऑफ हिस्टॉरिअन रो. किरण पोकळे, डायरेक्टर व्होकेश्नल सर्व्हिस रो. रुपेश पारकर आदींची निवड करण्यात आली.
    पदग्रहण सोहळा शनिवार दि ६ जुलै रोजी इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केलेला आहे. सदर सोहळयास प्रमुख पाहुणे व पद प्रधानाधिकारी रोटे. उत्कर्षा पाटील डिस्ट्रीक सेक्रेटरी इन्टरॅक्ट डिस्ट्रीक चेअरमन W3170 (25-26), अस्सिटंट गव्र्व्हनर डॉ. विद्याधर तायशेटे व डिस्ट्रीक सेक्रेटरी रो. प्रणय तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मॅगोसिटीचे अध्यक्ष रो. प्रविण पोकळे, सेक्रेटरी रो. विजय बांदिवडेकर व खजिनदार रो. अनिल कोरगावकर यांनी केले आहे.