जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड.....अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांची माघार

जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड.....अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांची माघार

 

सावंतवाडी

 

      सावंतवाडी तालुक्यातील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून, माजी सभापती प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कामत यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.कामत यांचा बांदा पंचक्रोशीत मोठा जनसंपर्क असून राजकारण आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आला आहे. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच विरोधकांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या महत्त्वाच्या मतदारसंघात भाजपने 'बिनविरोध' बाजी मारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, हे यश म्हणजे आगामी काळात भाजपच्या वर्चस्वाची नांदी मानली जात आहे.