कसाल येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ.
कसाल येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा 9 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत श्रीरामनवमी जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि 9 रोजी सकाळी नववर्ष स्वागतासाठी गुढीपाडवानिमित्त पावणाई मंदिर ते परबवाडी, कसाल बाजारपेठ, अशी नववर्ष स्वागतासाठी प्रभात फेरी काढण्यात आले होती.
दरम्यान मंगळवार दिनांक 9 रोजी गुढीपाडवा दिवशी सकाळी 9 वा, नववर्ष स्वागत प्रभात फेरी, घटस्थापना, सायंकाळी नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन, रात्री 9 वा. चित्ररथ दिंडी, असे कार्यक्रमात पहिल्या दिवशी पार पडले. बुधवार दिनांक 10 रोजी सायं, नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराण वाचन, रात्री 8 वा. कुंभारवाडी येथील चित्ररथ दिंडी. रात्रौ 9 वा. सिद्धेश्वर नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा दैवयोग हा नाट्य प्रयोग. गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायं, नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन, रात्री 9 वा. गांगोचीराई येथील चित्ररथ दिंडी. शुक्रवार दिनांक 12 रोजी सायं, नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराण वाचन, रात्री 9 वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा अजिंक्यमनी हा नाट्यप्रयोग. शनिवार दिनांक 13 रोजी सायं, नामस्मरण, रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन. रात्री 9 वाजता वझरेवाडी यांची चित्ररथ दिंडी. रविवारी दि. 14 रोजी सायं, नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराण वाचन. रात्री 9 वा. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग. लोककलेवर आधारित कार्यक्रम सिंधुदुर्ग प्रथमच. सोमवार दिनांक 15 रोजी सायं. नामस्मरण रामरक्षास्तोत्र पठण, पुराणवाचन, रात्री 8 वा. ह भ प भास्कर बुवा जोशी यांचे कीर्तन. रात्री 9वा. आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा पुष्करतीर्थ हा नाट्य प्रयोग. मंगळवार दिनांक 16 रोजी सायं नामस्मरण, रामरक्षा पठण, पुराणवाचन, रात्री 8 वा. कीर्तन, रात्री 9 वा. रुद्राक्ष कलाविष्कार प्रस्तुत आनंद सुवर्ण मराठी वाद्यवृंद, नृत्य, नाट्य यांचा मिलाप. बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी पुराणवाचन, 10 वा. कीर्तन, दुपारी 12 वा. श्रीराम जन्मोत्सव सोहळा दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायं 7 वा. दिपोत्सव. रात्री 8 वा. शालेय संस्कृती कार्यक्रम, 11-30. वा पालखी मिरवणूक, 12 वा. दशावतारी नाटक, विघ्नहर्ता रामेश्वर नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग. असे भरगच्च कार्यक्रम श्री देवी पावणाई रवळनाथ नाट्यप्रयोग. असे भरगच्च कार्यक्रम श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिरात होणार असून या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व गावकर मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.