सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत ४२,९४१ भगिनी पात्र.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत ४२,९४१ भगिनी पात्र.

सावंतवाडी.

   मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली . या समितीच्या अध्यक्ष , सदस्य , सदस्य सचिव यांची बैठक सिंधुदुर्गनगरी ओरस येथील जिल्हाधिकारी दालन येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रांताधिकारी व महीला बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
   या बैठकीत आतापर्यंत प्राप्त लाभार्थी यादीस मंजुरी देण्यात आली.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १,३५,५२७ लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली. यात सावंतवाडी तालुक्यातील २१,२२८, दोडामार्ग तालुक्यातील ६४०६  व वेंगुर्ले तालुक्यातील १५,३०७ पात्र लाभार्थी मंजूर करण्यात आले.
  " मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण " ही योजना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली. भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंचांनी शासनाला सहकार्य करत या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहभाग घेतला.त्यामुळेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ४२,९४१ भगिनींना रक्षाबंधना दिवशी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांची ३००० रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.