निवडणुकीत नेमके काय चुकले याचे सिहांवलोकन करणे आवश्यक : अँड प्रसाद करंदीकर.

निवडणुकीत नेमके काय चुकले याचे सिहांवलोकन  करणे आवश्यक : अँड प्रसाद करंदीकर.

देवगड.

  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाची हुलकावणी आम्हाला विजयाने दिली. दहा वर्षे या मतदारसंघाची सेवा करून देखील खासदार राऊत यांचा झालेला पराभव हा देवगड तालुक्यासाठी क्लेशदायक व त्रासदायक आहे.निवडणुकीत आमचं नेमकं काय चुकलं याचं सिंहावलोकन करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन शिवसेना नेते अँड प्रसाद करंदीकर यांनी केले. तसेच त्यांनी देवगड तालुका म्हणून आमच्याकडे लक्ष द्या अशी विनंती उपस्थित मान्यवरांकडे या कार्यक्रमादरम्यान केली.यापुढे मान खाली घालून जाण्याची वेळ येणार नाही.यादृष्टीने आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.अशी ग्वाही देखील यावेळी करंदीकर यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.
   महाविकास आघाडीच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड तालुक्यात जामसंडे सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या मतदार आभार कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.
   यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत महाविकास आघाडीचे सर्व नेते अरुण दुधवडकर ,नंदकुमार घाटे, सुशांत नाईक, रविंद्र जोगल, जयेश नर, मिलिंद साटम, सायली घाडीगावकर,हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते.