निरवडे येथे साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी.
निरवडे साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाच्या वतीने बुधवार २७ ते २९ मार्चपर्यत साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने बुधवार २७ रोजी सकाळी ८ वाजता मूर्तीपूजन व पादुका पूजन, दुपारी ११ वाजता आरती, दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व आरती (महिला मंडळ निरवडे झरबाजार ), सायंकाळी ६ वाजता संगीत रजनी (प्रायोजक प्रभावती कॉम्प्युटर संदिप दळवी) बुवा डॉ. श्रीराम दिक्षीत (हार्मोनियम गजानन मेत्री, तबला अक्षय सरवणकर, पखवाज मेहल कांडरकर ) रात्री ७.३० वाजता साटम महाराज कला क्रिडा मंडळाचे भजन व आरती.
गुरुवार २८ रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, सायंकाळी ७ ते ८.३० ह.भ.प.सौ. ललीन प्रभाकर तेली यांचे किर्तन, सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत भजनांचा कार्यक्रम व आरती. शुक्रवार २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता लिलाव, रात्री ९ वाजता संयुक्त दशावतार नाट्यमंडळ, यांचा " प्रतिकृष्ण " हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे यांनी केले आहे.